बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप मागे, कर्मचाऱ्यांना मिळणार साडेपाच हजार रुपये बोनस

बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप मागे, कर्मचाऱ्यांना मिळणार साडेपाच हजार रुपये बोनस

मुंबई : एसटीचा संप सुरू असतानाच बेस्ट कर्मचाऱ्यांनी बोनसच्या मागणीसाठी भाऊबीजेच्या दिवशी संप करण्याचा निर्णय घेतला होता.  मात्र, बेस्ट कर्मचाऱ्यांना साडे पाच हजार रुपये बोनस दिला जाणार आहे. त्यामुळे बेस्ट नियोजित संप मागे घेण्यात आला आहे. 

मुंबई महापालिका एकूण 41 हजार बेस्ट कर्मचाऱ्यांना बोनस देणार आहे. बेस्ट उपक्रमाला सानुग्रह अनुदानासाठी बेस्ट कमिटी 25 कोटी रूपये देणार आहे. ऐन दिवाळीच्या दिवसात मुंबईतील बेस्ट कर्मचाऱ्यांनी संपाचं हत्यार उपसलं होतं. बोनस जाहीर न झाल्यामुळे भाऊबीजेला म्हणजेच शनिवारी 21 ऑक्टोबरला बेस्ट कर्मचाऱ्यांनी एक दिवसाचा संप पुकारला होता. मागील वर्षीही बेस्ट कर्मचाऱ्यांना  साडेपाच हजार रूपये बोनस दिला होता.

COMMENTS