भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीसाठी भाजपकडून माजी आमदार तथा गोंदिया जिल्हा भाजपचे अध्यक्ष हेमंत पटले यांची उमेदवारी जाहीर होण्याची शक्यता आहे. तर राष्ट्रवादी काँगेसतर्फे, गोंदिया जिल्हा परिषद माजी अध्यक्ष विजय शिवनकर, तसेच जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष सुनील फुंडे यांचे नाव चर्चेत आहे.
परंतु अजूनपर्यंत कोणाच्याही नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं नसल्याची माहिती आहे. त्यामुळे ही उमेदवारी कोणाला देणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि काँग्रेसची उद्या बौठक होणार आहे. या सयुक्त बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारची घोषणा केली जाणार आहे. तसेच 10 मे रोजी या पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यात येणार आहेत.
त्यामुळे राष्ट्रवादी आणि काँग्रेसकडून कोणाच्या नावाची घोषणा केली जाते याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
COMMENTS