भंडारा रुग्णालयातील दुर्घटना आला अहवाल

भंडारा रुग्णालयातील दुर्घटना आला अहवाल

मुंबई : महाराष्ट्रासह संपूर्ण देशाच्या मनाला चटका लावणाऱ्या भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयातील आगीचा अहवाल समोर आला आहे. तपास अधिकाऱ्यांनी 50 पानांचा अहवाल सादर केला आहे. या आगीच्या घटनेसाठी शॉर्ट सर्किटचं कारण देण्यात आले असून यामध्ये दोन परिचारकांच्या बेजबाबदारपणामुळे आग लागल्याचं नमूद करण्यात आलं आहे.

9 जानेवारी रोजी रुग्णालायत नवजात शिशू युनिटमध्ये लागलेल्या या आगीत दहा बालकांचा मृत्यू झाला होता. रुग्णालयातील आगीनंतर नागपूरचे विभागीय आयुक्त संजीव कुमार यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी नेमण्यात आली आहे. त्यांनी हा 50 पानांचा अहवाल सादर केला आहे. शॉर्ट सर्किटमुळे आग लागली असावी असा प्राथमिक अंदाज घडना घडली त्यावेळी वर्तवण्यात आला होता. अहवालातही शॉर्ट सर्किटचाच उल्लेख करण्यात आला आहे. तसंच रुग्णालयात स्टाफ कमी होता. प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, आग लागली त्यावेळी तिथे कोणीही उपस्थित नव्हतं. त्यामुळे या घटनेबाबत रुग्णालयातील कर्मचाऱ्यांकडे बोट दाखवण्यात आलं आहे.

या अहवालात असे म्हटले आहे की, आग लागली तेव्ह संबंधित वॉर्डमध्ये कोणीही उपस्थित नव्हते, यासाठी दोन नर्स आणि काही वरिष्ठ अधिकारीही जबाबदार आहेत. रुग्णालय प्रशासनाने योग्य ती खबरदारी घेतली असती तर घटना टाळता आली असती असे म्हटले आहे. भंडारा जिल्हा रुग्णालयात राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत या अहवालावर चर्चा होणार आहे.

या अहवालाचा अभ्यास आणि चर्चा आमच्या विभागस्तरावर केली जाईल. अहवालाच्या निष्कर्षाच्या अनुषंगाने कारवाई केली जाईल. या प्रकरणी दुर्लक्ष करणार्यांकना शिक्षा होईलच यात शंका नाही, मात्र ही सगळी सिस्टीम दुरुस्त करण्यासाठी ओव्हरअल प्रयत्नशील राहू, असं आश्वासनही राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिलं आहे.

COMMENTS