उस्मानाबाद – काँग्रेसच्या भारत बंदला उस्मानाबाद जिल्ह्यात संमिश्र प्रतिसाद मिळाला आहे. आज सकाळी 10 वाजता उस्मानाबाद शहर काँग्रेसच्यावतीने फेरी काढून व्यापाऱ्यांना दुकान बंद ठेवण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्याला अल्प प्रतिसाद मिळाला तसेच या बंदला देशभरातील 21 संघटनांनी पाठिंबा दर्शवला असला तरी उस्मानाबाद येथे मात्र फक्त काँग्रेसशिवाय कोणीच रस्त्यावर उतरले नाही. या बंदमध्ये मोटार चालक मालक संघटना ऑटो रिक्षा संघटना व मनसेने पाठिंबा दिला. तर राष्ट्रवादी काँग्रेसने फक्त पाठिंबा दिला आहे. यात मोटार चालक मालक संघटनेचे अध्यक्ष या फेरीत सहभागी झाले आहेत.
पेट्रोल डिझेलच्या वाढलेल्या दरामुळे सर्वसामान्यांचे आर्थिक हाल होत आहेत. याचा निषेध करण्यासाठी हे आजचे बंदचे आंदोलन करण्यात आले आहे.दरम्यान उमरगा तुळजापूर या ठिकाणी ही बंदचे आवाहन करण्यात आले होते या ठिकाणी ही संमिश्र प्रतिसाद मिळाला आहे.बंदच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सर्व शाळा महाविद्यालयाला 10 वाजल्यानंतर सुट्टी देण्यात आली.
COMMENTS