मुंबई – इंधन दरवाढीच्या विरोधात काँग्रेससह विरोधी पक्षांनी पुकारलेल्या भारत बंदला मनसेनंही पाठिंबा दिला आहे. केवळ पाठिंबाच नाही तर बंदमध्ये सक्रीय सहभाग असेल असं मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पत्रक काढून स्पष्ट केलं आहे. दरम्यान या मनसेच्या भूमिकेमुळे मुंबई पोलिसांनी मनसेच्या कार्यकर्त्यांना नोटीसा बचावल्या आहेत. उद्या कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर तुम्हाला जबाबदार धरलं जाईल असं नोटीसीत म्हटलं आहे.
Mumbai Police serves notice under section 149 to Maharashtra Navnirman Sena party workers in Mumbai, states, if any law and order situation arises in tomorrow’s Bharat Bandh they will be held responsible.
— ANI (@ANI) September 9, 2018
दरम्यान कितीही नोटीसा द्या उद्याचा भारत बंद यशस्वी होईल असं उत्तर मनसेतर्फे देण्यात आलं आहे.
किती ही नोटीस द्या भारत बंद होणारच pic.twitter.com/1wGM54tF5z
— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) September 9, 2018
दरम्यान काँग्रेस आणि मनसेसह राष्ट्रवादी काँग्रेस, शेकाप, समाजवादी पार्टी, पिपल्स रिपब्लिकन पक्ष, रिपाई गवई गट, स्वाभिमान शेतकरी संघटना आणि इतर पक्षांनी पाठींबा दिला आहे. साजनिक मालमत्तेच नुरसान होणार नाही याची दक्षता कार्यकर्त्यांनी घ्यावी असे आदेश काँग्रेसनं कार्यकर्त्यांना दिले आहेत.
COMMENTS