वंचित बहुजन विकास आघाडी आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेत आघाडी होणार?

वंचित बहुजन विकास आघाडी आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेत आघाडी होणार?

अकोला – स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तूपकर आणि भारिपचे राष्ट्रीय अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांच्यात शनिवारी अकोला येथे बैठक पार पडली. या दोन्ही पक्षांनी युती केल्यास आगामी निवडणुकीत त्याचा कसा फायदा होईल, याबाबत दोन्ही नेत्यांमध्ये सखोल चर्चा झाल्याची माहिती आहे. तसेच मुंबई येथे ६ ऑक्टोबर रोजी बैठक होणार आहे. या बैठकीत युतीचे भवितव्य ठरणार असल्याचं रविकांत तूपकर यांनी म्हटलं आहे.

भारिपला काँग्रेसचे वावडे नाही

अ‍ॅड. आंबेडकर व रविकांत तूपकर यांच्यादरम्यान अकोला येथे पार पडलेल्या बैठकीत विविध मुद्यांवर चर्चा झाली. राष्ट्रवादी काँग्रेससोबतचे संबंध कडवट झाल्याचे पृष्ठभूमीवर अ‍ॅड. आंबेडकर यांनी भारिपला काँग्रेसचे वावडे नसल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि भारिपमध्ये युती झाल्यास काँग्रेसलाही सोबत घेण्याला आपला विरोध नसल्याचे आंबेडकर यांनी रविकांत तूपकर यांना सांगितले आहे. त्यामुळे आगामी निवडणुकी भारिप आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेमध्ये युती होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

COMMENTS