नवी दिल्ली – अध्यात्मिक गुरू भय्यू महाराज यांच्या आत्यमहत्येबाबात खळबळजनक गौप्यस्फोट करण्यात आला आहे. भय्यू महराज यांच्यावर सरकारचा दबाव असल्याची धक्कादायक माहिती समोर येत असून भय्यू महाराजांजवळ नर्मदा घोटाळ्याचे पुरावे होते. त्यामुळे त्यांच्यावर सरकारचा दबाव होता असा खळबळजनक आरोप राष्ट्रीय राजपूत करणी सेनेनं केला आहे. त्यामुळे सीबीआयकडून या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणीही करणी सेनेनं केली आहे.
दरम्यान भय्यू महाराजांकडे नर्मदा घोटाळ्याचे कागदपत्रे होती. त्यांनी ही कागदपत्रे उघड करू नये म्हणून सरकारने त्यांच्यावर दबाव टाकला होता.याबाबतची माहिती आम्हाला सोशल मीडिया आणि इतर स्त्रोतांकडून मिळाली असल्याचं करणी सेनेनं म्हटलं आहे. त्यामुळे या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे देण्यात यावा तसेच जर सरकारने सीबीआय चौकशीचे आदेश दिले नाही तर करणी सेना आंदोलन करणार असल्याचा इशारा करणी सेनेचे अध्यक्ष सुखदेव सिंह गोगामेडी यांनी दिला आहे.
COMMENTS