पुणे – भीमा कोरेगाव प्रकरणाला ११ दिवस होऊन गेले तरीही याचे मुख्य सुत्रधार व आरोपी मिलींद एकबोटे आणि मनोहर भिडे यांना अटक का होत नाही? सरकारमधील कोणता नेता त्यांना पाठिशी घालतोय असा सवाल संभाजी ब्रिगेडनं केला आहे. तसेच जातीय दंगलीचा हा पूर्वनियोजित कट असून यामध्ये भिडे आणि एकबोटे या दोघांचा व त्यांच्या कार्यकर्त्यांचा सहभाग आहे. परंतु सरकार सुडबुध्दीने संघाच्या कार्यकर्त्यांना हाताशी धरून खोट्या तक्रारी दाखल केल्या जात आहेत. हे निषेधार्ह असल्याचं संभाजी ब्रिगेडचे पुणे जिल्हाध्यक्ष संतोष शिंदे यांनी म्हटलं आहे. तसेच या दोघांना अटक झाली नाही तर रस्त्यावर उतरण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.
दरम्यान वढू बू, येथील गोविंद गायकवाड यांच्या समाधीची मोडतोड करणारे व दोन दिवस गावात जावून निषेधाच्या घोषणा देणारे खरे दोषी आहेत. हे गावाबाहेरचे लोक असून ते समस्त हिंदू आघाडी व शिवप्रतिष्ठान’चे कार्यकर्ते आहेत. यांच्यामुळेच भिमा कोरेगाव दंगल प्रकरण घडले असून ११ दिवस होऊन सुद्धा मुख्य सुत्रधार व आरोपी मिलींद एकबोटे व मनोहर भिडे यांना अटक केली जात नाही. त्यामुळे त्यांना जर लवकरात लवकर अटक केली नाही तर रस्त्यावर उतरण्याचा इशारा संभाजी ब्रिगेडनं दिला आहे.
COMMENTS