मुख्यमंत्र्यांनी हिंसाचारानंतर पोलिसांना दिलेल्या आदेशांची माहिती मागवा – प्रकाश आंबेडकर

मुख्यमंत्र्यांनी हिंसाचारानंतर पोलिसांना दिलेल्या आदेशांची माहिती मागवा – प्रकाश आंबेडकर

मुंबई – कोरेगाव भीमा हिंसाचाराप्रकरणी चौकशी आयोगासमोर भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी आपली बाजू मांडली. यावेळी बोलत असताना त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्य पोलीसही जबाबदार असून मुख्यमंत्र्यांनी हिंसाचारानंतर पोलिसांना दिलेल्या आदेशांची चौकशी आयोगाने माहिती मागवण्याची विनंती प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे.

दरम्यान कोरेगाव भीमा येथे १ जानेवारी २०१८ रोजी सकाळी पावणे दहाच्या सुमारास हिंसाचारास सुरुवात झाली. त्याची माहिती मला मिळताच त्या क्षणी मी पुणे ग्रामीण पोलिसांशी फोन वरुन संपर्क साधला. मात्र, पोलिसांकडून कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद मिळाला नसल्याचं वक्तव्य प्रकाश आंबेडकर यांनी केलं आहे.

तसेच या घटनेला मुख्यमंत्री, सचिव, गृहराज्यमंत्री रणजीत पाटील, केंद्रीय गुप्तचर संघटना यासोबतच पालकमंत्री गिरीश बापट आणि पोलीस प्रशासन जबाबदार असल्याचा आरोपही यावेळी त्यांनी केला आहे. तसेच हिंसाचारासाठी संभाजी भिडेच जबाबदार असल्याचा पुनरुच्चारही प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.

 

COMMENTS