पुणे – काही महिन्यांवर येऊन ठेपलेल्या विधानसभा निवडणुकीसाठी भोसरी मतदारसंघाचे विद्यमान आमदार महेश लांडगे सज्ज झाले आहेत. विधानसभेचे मैदान गाजवण्यासाठी तयार असल्याचे संकेत त्यांनी दिले आहेत. त्यामुळे महेश लांडगे यांच्याविरोधात राष्टेरवादीकडून कोण उमेदवार असणार याबाबतची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
दरम्यान महेश लांडगे यांच्याविरोधात निवडणूक लढवण्यासाठी माजी आमदार विलास लांडे हे तयार असल्याची माहिती आहे. परंतु, मतदारसंघाचा राजकीय अंदाज घेतल्यानंतर लांडे हे आपल्याऐवजी पत्नी व माजी महापौर मोहिनी लांडे यांना विधानसभेच्या निवडणूक रिंगणात उतरवतील, असाही राजकीय अंदाज बांधला जात आहे.परंतु, लांडे हे राष्ट्रवादीकडून लढणार की अन्य कोणत्या राजकीय पक्षांकडून याबाबत मात्र राजकीय वर्तुळात अनिश्चितता वर्तविली जात आहे.
त्याचबरोबर लांडे यांच्यासह राष्ट्रवादीकडून विरोधी पक्षनेते दत्ता साने यांचेही नाव विधानसभेसाठी चर्चेत आहे. त्यामुळे याबाबत राष्टेरवादीकडून काय निर्णय घेतला जातो याकडे लक्ष लागलं आहे.
COMMENTS