छगन भुजबळांनी घेतली शरद पवारांची भेट, ‘या’ विषयावर केवी चर्चा!

छगन भुजबळांनी घेतली शरद पवारांची भेट, ‘या’ विषयावर केवी चर्चा!

मुंबई – राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी आज भेट घेतली आहे. या भेटीत केशरी रेशन कार्ड धारकांना अशा कठीण काळात धान्य वाटप करता येईल का? यावर चर्चा झाल्याचं माहिती आहे. ही भेट शरद पवार यांच्या मुंबईतल्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी पार पडली आहे.

दरम्यान महाविकास आघाडी सरकारने हातावर पोट असलेल्या आणि गरीब गरजुंसाठी अन्नधान्याच्या विविध योजना हाती घेतल्या आहेत. मात्र केशरी रेशन कार्डधारकांचाही राज्य सरकारने योग्य तो विचार करावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली होती. या संबधी आज राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी शरद पवार यांची भेट घेतली.

या भेटीत लॉकडाउन परिस्थितीत केशरी रेशन कार्डधारक तसेच समाजातील गरीब घटकांना योग्य अन्न-धान्य पुरवठा करण्यासंबंधी महाराष्ट्र सरकारने काय उपाययोजना केल्या आहेत, याबाबत भुजबळ यांनी शरद पवार यांना माहिती दिली आहे.

राज्यात केशरी कार्ड धारकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. केशरी कार्ड धारकांना यापूर्वी रेशनिंगवर धान्य दिलं जात नव्हतं. जर राज्य सरकारने लॉकडाऊनच्या काळात या नागरिकांनाही धान्य देता येईल का? यावर विचार सुरू केला आहे. केशरी कार्ड धारकांना रेशनिंग म्हणून धान्य वाटप करण्याचा निर्णय झाला, तर एका कुटूंबाला किती धान्य दिलं जाईल, हे अजून स्पष्ट झालेलं नाही.

COMMENTS