नवी दिल्ली – राष्ट्रीय पक्ष असलेल्या भारतीय जनता पार्टीला सर्वाधिक मोठा निवडणूक निधी देण्यात आला आहे. आर्थिक वर्ष २०१७-१८मध्ये भारतीय जनता पार्टीला ७ कंपन्यांनी एका ट्रस्टच्या माध्यमातून भाजपाला एकूण १६९ पैकी १४४ कोटी रुपयांची देणगी दिली आहे. आजपर्यंत कोणत्याही राष्ट्रीय पक्षाला एवढा मोठा निधी देण्यात आलेला आहे. आजवर कायमच छोट्या राजकीय पक्षांना देणग्या देणाऱ्या या ट्रस्टने पहिल्यांदाच एका राष्ट्रीय पक्षाला सर्वाधिक देणगी दिली आहे. ‘प्रूडेंट इलेक्ट्रोरेल ट्रस्ट’ असे देणगी देणाऱ्या ट्रस्टचे नाव आहे. या कंपन्यांनी काँग्रेस आणि बिजू जनता दल या पक्षांनाही देणगी दिली आहे.
‘प्रूडेंट इलेक्ट्रोरेल ट्रस्ट’ला याआधी ‘सत्या इलेक्ट्रोल ट्रस्ट’ नावाने ओळखले जात होते. ज्या कंपन्यांनी या ट्रस्टच्या माध्यमांतून देणग्या दिल्या आहेत. त्यामध्ये
ट्रस्टच्या माध्यमातून या कंपन्यांनी दिला निधी
डीएलएफ (५२ कोटी), भारती ग्रुप (३३ कोटी), श्रॉफ ग्रुप (२२ कोटी), टोरेंट ग्रुप (२० कोटी), डीसीएम श्रीराम (१३ कोटी), केडिला ग्रुप (१० कोटी) आणि हल्दिया एनर्जी (८ कोटी)
या ट्रस्टने प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसला केवळ १० कोटी, बिजू जनता दलला ५ कोटी रुपयांची देणगी या आर्थिक वर्षात दिली आहे. तसेच शिरोमणी अकाली दल, समाजवादी पार्टी, आम आदमी पार्टी आणि राष्ट्रीय लोकदल या पक्षांनाही या ट्रस्टने यापूर्वी देणग्या दिल्या आहेत.इकॉनॉमिक्स टाइम्सने यासंदर्भात बातमी दिली आहे.
COMMENTS