मुंबई – बिहार विधानसभा निवडणूक जाहीर करण्यात आली आहे. बिहारमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे विशेष काळजी घेऊन ही निवडणूक पार पडणार आहे. या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगानं काही नियम लागू केले आहेत. कोरोनामुळे नमके कोण कोणते नवीन नियम लागू करण्यात आले आहेत ते आपण पाहणार आहोत.
बिहार निवडणुकीमध्ये एकूण ७ कोटी ७९ लाख मतदार असून यामध्ये ३ कोटी ७९ लाख पुरूष मतदार तर ३ कोटी ३९ लाख महिला मतदार आहेत. या निवडणुकीदरम्यान ६ लाख फेस शील्डचा वापर केला जाणार असून
१.८९ लाख बॅलेट युनिट ईव्हीएम असणार आहेत.
या मतदानाची वेळ एक तास वाढविली असून सकाळी ७ ते संध्याकाळी ६ पर्यंत मतदारन पार पडणार आहे. या निवडणुकीत कोरोना रूग्णांना देखील मतदान करता येणार आहे.
शेवटच्या तासात कोरोना रूग्ण मतदान करू शकतात असं निवडणूक आयोगान म्हटलं आहे.
तसेच या निवडणुकीच्या प्रचारासाठी देखील नियम लागू करण्यात आले आहेत. पाच पेक्षा जास्त लोक घरी जाऊन प्रचार करू शकणार नाही. सभा/प्रचार फक्त वर्च्युअल असणार आहे. नामांकन करतेवेळी फक्त दोघांना परवानगी देण्यात आली असून रोड शो मध्ये ५ गाड्या वापरता येणार आहेत. तसेच
प्रचार करताना सोशल डिस्टन्सिंगचं पालन करावं लागणार आहे. तसेच मतदानादरम्यान ४५ लाख मास्क
६ लाख पीपीई किटचा उपयोग देखील केला जाणार आहे.
तीन टप्प्यात होणार मतदान
पहिला : ७१ मतदारसंघ (१६ जिल्हे)
दुसरा : ९४ मतदारसंघ (१७ जिल्हे)
तिसरा: ७८ मतदारसंघ (१५ जिल्हे)
३३.५ हजार पोलींग स्टेशन असणार आहे.
मतदानाचा पहिल्या टप्प्यात २८ आक्टोबरला मतदान होणार आहे. तर दुसय्रा टप्प्यात ३ नोव्हेंबर आणि
तिसय्रा टप्प्यात ७ नोव्हेंबरला मतदान पार पडणार आहे. १० नोव्हेंबररोजी मतमोजणी होणार आहे.
COMMENTS