एनडीए-महागठबंधनमध्ये काँटे की टक्कर,  कोण किती जागांवर आघाडीवर ?, शिवसेना किती जागांवर आघाडीवर ? पाहा अपडेट मतमोजणी

एनडीए-महागठबंधनमध्ये काँटे की टक्कर, कोण किती जागांवर आघाडीवर ?, शिवसेना किती जागांवर आघाडीवर ? पाहा अपडेट मतमोजणी

मुंबई – बिहार विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू आहे. पहिले कल हाती आले आहेत. एनडीए आणि महागठबंधनमध्ये काँटे की टक्कर सुरू आहे. सुरुवातीला जास्त जागांवर आघाडीवर असलेल्या महागठबंधनला एनडीएनं मागे टाकले आहे. तर या निवडणुकीच्या मैदानात उतरलेल्या शिवसेनेला मात्र अजून भोपळाही फोडता आलेला नाही. शिवसेनेनं बिहार विधानसभा निवडणूक लढण्याची घोषणा केली होती. शिवसेनेनं बिहार विधानसभा निवडणुकीत 50 जागा लढवण्याची तयारी केली होती. विशेष म्हणजे, शिवसेनेच्या धनुष्यबाण या चिन्हाला मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या JDU ने आक्षेप घेतला होता. शिवसेना स्थानिक राजकीय पक्ष नाही. तसंच शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हाचे आमच्या चिन्हाशी साधर्म्य असल्याने मतदारांचा गोंधळ होतो. आमची मते शिवसेनेला जातात असा जेडीयूनं आक्षेप घेतला होता. निवडणूक आयोगाने तो मुद्दा ग्राह्य धरत शिवसेनेला तुतारी हे चिन्ह दिले होते. परंतु शिवसेनेची तुतारी मात्र, कुठेही वाजली नसल्याचं दिसत आहे. शिवसेनेनं एकाही जागेवर अद्याप आघाडी सुद्धा उघडली नाही. त्यामुळे सेनेच्या उमेदवारांचे डिपॉझिट जप्त होण्याचे चिन्ह आहेत.

दरम्यान महागठबंधनचे मुख्यमंत्रीपदाचे दावेदार असलेल्या तेजस्वी यादव यांचं स्वप्न भंगणार असल्याचं दिसत आहे. कारण एनडीए महागठबंधनपेक्षा जास्त जागांवर आघाडीवर आहे. मतमोजणीच्या सुरुवातीच्या टप्प्यात आघाडीवर असलेली महागठबंधन आता पिछाडीवर पडली आहे. तर भाजपप्रणित एनडीएने आता जवळपास 128 जागांवर आघाडी घेतली आहे. तर महागठबंधन 102 जागांवर आघाडीवर आहे. बहुमतासाठी 122 जागांची गरज आहे.

एकूण जागा – 243

एनडीए – 125

महागठबंधन – 105

इतर – 13

———

महागठबंधन

आरजेडी – 66

काँग्रेस – 21

इतर – 19

एनडीए

जेडीयू – 47

भाजप – 73

व्हीआयपी – 06

इतर – 00

एक्झिट पोल्सच्या आकडेवारीनुसार बिहारमध्ये महागठबंधनचा दणदणीत विजय होऊन तेजस्वी यादव मुख्यमंत्रिपदी विराजमान होतील, असा अंदाज वर्तविण्यात आला होता. परंतु आता महागठबंधन पिछाडीवर असल्यामुळे तेजस्वी यादव याचं मुख्यमंत्रीपदाचं स्वप्न भंगणार असल्याचं दिसत आहे.

एक्झिट पोल्स

सर्व पोलचा एकत्रित अंदाज

एकूण जागा – 243

आरजेडी – काँग्रेस – 122

भाजप – जेडीयू – 112

इतर –    09

रिपब्लिकचा अंदाज

एकूण जागा – 243 जागा

आरजेडी – काँग्रेस – 91 ते 117

बीजेपी – जेडीयू -118 ते 138

इतर          – 5 ते 12

टीव्ही 9 चा अंदाज –

एकूण जागा – 243 जागा

आरजेडी – काँग्रेस – 115 ते 125

बीजेपी – जेडीयू – 110 ते 120

इतर          – 15 ते 20

C Voter चा अंदाज

एकूण जागा – 243

आरजेडी-काँग्रेस – 120

बीजेपी-जेडीयू – 116

इतर – 07

मागील निवडणुकीत म्हणजे 2015 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रीय जनता दल आणि जनता दल युनायटेड यांनी एकत्र निवडणूक लढवली होती. त्यावेळी राजद-जदयू महागठबंधनला 178 जागा मिळाल्या होत्या. राजदला 80, जनता दल युनायटेडला 71 आणि काँग्रेस पक्षाला 27 जागा मिळाल्या होत्या. तर उर्वरीत 58 जागा भाजप प्रणित एनडीएच्या वाट्याला आल्या होत्या.

COMMENTS