बिहार – बिहार विधानसभा निवडणुकीतील काही जागांचा निकाल हाती आला आहे. या निकालानुसार एनडीएने 8 तर महागठबंधननं 5 जागांवर विजय मिळवला आहे. एनडीएतील जदयूने 3 जागेवर आणि भाजपने 5 जागांवर विजय मिळवला आहे. तर महागठबंधनने 5 जागा जिंकल्या आहेत. दरभंगातील केवटी मतदारसंघातून भाजपचे उमेदवार मुरारी मोहन झा हे विजयी झाले आहे. त्यांनी राजदचे उमेदवार अब्दुल सिद्दिकी यांचा पराभव केला आहे. तर रक्सौलमधून भाजपचे प्रमोद कुमार सिन्हा विजयी झाले आहेत. आज सकाळपासून सुरू असलेल्या मतमोजणीत एनडीए आणि महागठबंधनमध्ये काँटे की टक्कर पाहायला मिळाली आहे. एनडीएने सर्वाधिक 128 जागांवर आघाडी घेतली आहे. तर बहुमतासाठी लागत असलेल्या 103 जागांचा आकडा एनडीएने पार केला आहे.
कोण आघाडीवर कोण पिछाडीवर?
एकूण जागा – 243
एनडीए – 128
महागठबंधन – 103
इतर – 12
———
महागठबंधन
आरजेडी – 67
काँग्रेस – 21
इतर – 18
एनडीए
जेडीयू – 48
भाजप – 73
व्हीआयपी – 05
इतर – 01
एक्झिट पोल्सच्या आकडेवारीनुसार बिहारमध्ये महागठबंधनचा दणदणीत विजय होऊन तेजस्वी यादव मुख्यमंत्रिपदी विराजमान होतील, असा अंदाज वर्तविण्यात आला होता. परंतु आता महागठबंधन पिछाडीवर असल्यामुळे तेजस्वी यादव याचं मुख्यमंत्रीपदाचं स्वप्न भंगणार असल्याचं दिसत आहे.
एक्झिट पोल्स
सर्व पोलचा एकत्रित अंदाज
एकूण जागा – 243
आरजेडी – काँग्रेस – 122
भाजप – जेडीयू – 112
इतर – 09
रिपब्लिकचा अंदाज
एकूण जागा – 243 जागा
आरजेडी – काँग्रेस – 91 ते 117
बीजेपी – जेडीयू -118 ते 138
इतर – 5 ते 12
टीव्ही 9 चा अंदाज –
एकूण जागा – 243 जागा
आरजेडी – काँग्रेस – 115 ते 125
बीजेपी – जेडीयू – 110 ते 120
इतर – 15 ते 20
C Voter चा अंदाज
एकूण जागा – 243
आरजेडी-काँग्रेस – 120
बीजेपी-जेडीयू – 116
इतर – 07
मागील निवडणुकीत म्हणजे 2015 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रीय जनता दल आणि जनता दल युनायटेड यांनी एकत्र निवडणूक लढवली होती. त्यावेळी राजद-जदयू महागठबंधनला 178 जागा मिळाल्या होत्या. राजदला 80, जनता दल युनायटेडला 71 आणि काँग्रेस पक्षाला 27 जागा मिळाल्या होत्या. तर उर्वरीत 58 जागा भाजप प्रणित एनडीएच्या वाट्याला आल्या होत्या.
COMMENTS