बिहार – बिहार निवडणुकीचा निकाल अखेर हाती आला आहे. या निवडणुकीत भाजपाप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीने (NDA) स्पष्ट बहुमत मिळवलं आहे. सर्व 243 जागांचे निकाल हाती आले असून NDA ने 125 जागा मिळवल्या आहेत. या 125 जागांमध्ये 74 जागा भाजपाने, 43 जागा जदयूने तर मित्र पक्षांनी 8 जागांवर विजय मिळवला आहे. त्यामुळे नितीश कुमार हेच बिहारचे मुख्यमंत्री होतील हे पुन्हा एकदा स्पष्ट झालं आहे.तर दुसरीकडे महाआघाडीने 110 जागा मिळवल्या आहेत. यामध्ये सर्वात जास्त म्हणजेच 75 जागा तेजस्वी यादव यांच्या राजदला मिळाल्या आहेत. त्यामुळे राजद हा सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. तर महाआघाडीतल्या काँग्रेसला 19 जागांवर, डाव्यांना 16 जागांवर विजय मिळाला आहे. तर एमआयएमला पाच जागा, बसपा, लोजपा आणि अपक्ष यांना प्रत्येकी एका जागेवर विजय मिळवता आला आहे.
एकूण जागा – 243
एनडीए – 125
महागठबंधन – 110
इतर – 08
———
महागठबंधन
आरजेडी – 75
काँग्रेस – 19
इतर – 16
एनडीए
जेडीयू – 43
भाजप – 74
इतर – 08
बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालाबाबत पंतप्रधान मोदींनी बिहारच्या जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. ट्विटद्वारे त्यांनी बिहारच्या जनतेचे आभार मानले आहेत.
बिहार में जनता-जनार्दन के आशीर्वाद से लोकतंत्र ने एक बार फिर विजय प्राप्त की है।@BJP4Bihar के साथ एनडीए के सभी कार्यकर्ताओं ने जिस संकल्प-समर्पण भाव के साथ कार्य किया, वह अभिभूत करने वाला है। मैं कार्यकर्ताओं को बधाई देता हूं और बिहार की जनता के प्रति हृदय से आभार प्रकट करता हूं।
— Narendra Modi (@narendramodi) November 10, 2020
बिहार के गांव-गरीब, किसान-श्रमिक, व्यापारी-दुकानदार, हर वर्ग ने NDA के ‘सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास’ के मूल मंत्र पर भरोसा जताया है। मैं बिहार के हर नागरिक को फिर आश्वस्त करता हूं कि हर व्यक्ति, हर क्षेत्र के संतुलित विकास के लिए हम पूरे समर्पण से निरंतर काम करते रहेंगे।
— Narendra Modi (@narendramodi) November 10, 2020
बिहार की बहनों-बेटियों ने इस बार रिकॉर्ड संख्या में वोटिंग कर दिखा दिया है कि आत्मनिर्भर बिहार में उनकी भूमिका कितनी बड़ी है। हमें संतोष है कि बीते वर्षों में बिहार की मातृशक्ति को नया आत्मविश्वास देने का NDA को अवसर मिला। यह आत्मविश्वास बिहार को आगे बढ़ाने में हमें शक्ति देगा।
— Narendra Modi (@narendramodi) November 10, 2020
तर अमित शहा यांनी ट्विटद्वारे विरोधी पक्षांवर निशाणा साधला आहे.पोकळ राजकारण, जातीवाद आणि तुष्टीकरणाच्या राजकारणाला नकार देऊन बिहारच्या लोकांनी एनडीएचा विकासवाद निवडला असल्याचं त्यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे.
बिहार के हर वर्ग ने फिर एक बार खोखलेवादे, जातिवाद और तुष्टिकरण की राजनीति को सिरे से नकार कर NDA के विकासवाद का परचम लहराया है।
यह हर बिहारवासी की आशाओं और आकांक्षाओं की जीत है…@narendramodi जी और @nitishkumar जी के डबल इंजन विकास की जीत है।@BJP4Bihar के कार्यकर्ताओं को बधाई।
— Amit Shah (@AmitShah) November 10, 2020
दरम्यान या निकालावरुन एक्झिट पोल खोटे ठरले आहेत. सुरुवातीला स्पष्ट राजदकडे आणि नंतर बराच काळ भाजपकडे झुकलेल्या या निवडणुकीचं चित्र पूर्णपणे बदललं आहे.
एक्झिट पोल्सच्या आकडेवारीनुसार बिहारमध्ये महागठबंधनचा दणदणीत विजय होऊन तेजस्वी यादव मुख्यमंत्रिपदी विराजमान होतील, असा अंदाज वर्तविण्यात आला होता. परंतु एनडीएनं स्पष्ट बहूमत मिळवल्यामुळे तेजस्वी यादव याचं मुख्यमंत्रीपदाचं स्वप्न भंगलं असल्याचं दिसत आहे.
एक्झिट पोल्स
सर्व पोलचा एकत्रित अंदाज
एकूण जागा – 243
आरजेडी – काँग्रेस – 122
भाजप – जेडीयू – 112
इतर – 09
रिपब्लिकचा अंदाज
एकूण जागा – 243 जागा
आरजेडी – काँग्रेस – 91 ते 117
बीजेपी – जेडीयू -118 ते 138
इतर – 5 ते 12
टीव्ही 9 चा अंदाज –
एकूण जागा – 243 जागा
आरजेडी – काँग्रेस – 115 ते 125
बीजेपी – जेडीयू – 110 ते 120
इतर – 15 ते 20
C Voter चा अंदाज
एकूण जागा – 243
आरजेडी-काँग्रेस – 120
बीजेपी-जेडीयू – 116
इतर – 07
मागील निवडणुकीत म्हणजे 2015 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रीय जनता दल आणि जनता दल युनायटेड यांनी एकत्र निवडणूक लढवली होती. त्यावेळी राजद-जदयू महागठबंधनला 178 जागा मिळाल्या होत्या. राजदला 80, जनता दल युनायटेडला 71 आणि काँग्रेस पक्षाला 27 जागा मिळाल्या होत्या. तर उर्वरीत 58 जागा भाजप प्रणित एनडीएच्या वाट्याला आल्या होत्या.
COMMENTS