नवी दिल्ली – बिहार विधानसभा निवडणुकीत चुरस पहायला मिळत आहे. सुरुवातीला जास्त जागांवर आघाडीवर असलेल्या महागठबंधनला एनडीएनं मागे टाकले आहे. त्यामुळे महागठबंधनचे मुख्यमंत्रीपदाचे दावेदार असलेल्या तेजस्वी यादव यांचं स्वप्न भंगणार असल्याचं दिसत आहे. कारण एनडीए महागठबंधनपेक्षा जास्त जागांवर आघाडीवर आहे. मतमोजणीच्या सुरुवातीच्या टप्प्यात आघाडीवर असलेली महागठबंधन आता पिछाडीवर पडली आहे. तर भाजपप्रणित एनडीएने आता जवळपास 128 जागांवर आघाडी घेतली आहे. तर महागठबंधन 102 जागांवर आघाडीवर आहे. बहुमतासाठी 122 जागांची गरज आहे.
एकूण जागा – 243
एनडीए – 128
महागठबंधन – 101
इतर – 13
———
महागठबंधन
आरजेडी – 62
काँग्रेस – 21
इतर – 19
एनडीए
जेडीयू – 47
भाजप – 73
व्हीआयपी – 06
इतर – 01
एक्झिट पोल्सच्या आकडेवारीनुसार बिहारमध्ये महागठबंधनचा दणदणीत विजय होऊन तेजस्वी यादव मुख्यमंत्रिपदी विराजमान होतील, असा अंदाज वर्तविण्यात आला होता. परंतु आता महागठबंधन पिछाडीवर असल्यामुळे तेजस्वी यादव याचं मुख्यमंत्रीपदाचं स्वप्न भंगणार असल्याचं दिसत आहे.
एक्झिट पोल्स
सर्व पोलचा एकत्रित अंदाज
एकूण जागा – 243
आरजेडी – काँग्रेस – 122
भाजप – जेडीयू – 112
इतर – 09
रिपब्लिकचा अंदाज
एकूण जागा – 243 जागा
आरजेडी – काँग्रेस – 91 ते 117
बीजेपी – जेडीयू -118 ते 138
इतर – 5 ते 12
टीव्ही 9 चा अंदाज –
एकूण जागा – 243 जागा
आरजेडी – काँग्रेस – 115 ते 125
बीजेपी – जेडीयू – 110 ते 120
इतर – 15 ते 20
C Voter चा अंदाज
एकूण जागा – 243
आरजेडी-काँग्रेस – 120
बीजेपी-जेडीयू – 116
इतर – 07
मागील निवडणुकीत म्हणजे 2015 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रीय जनता दल आणि जनता दल युनायटेड यांनी एकत्र निवडणूक लढवली होती. त्यावेळी राजद-जदयू महागठबंधनला 178 जागा मिळाल्या होत्या. राजदला 80, जनता दल युनायटेडला 71 आणि काँग्रेस पक्षाला 27 जागा मिळाल्या होत्या. तर उर्वरीत 58 जागा भाजप प्रणित एनडीएच्या वाट्याला आल्या होत्या.
COMMENTS