बिहारमध्ये पहिल्यांदाच भाजप प्रथम क्रमांकाचा पक्ष, मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या निवासस्थानी महत्त्वाची बैठक !

बिहारमध्ये पहिल्यांदाच भाजप प्रथम क्रमांकाचा पक्ष, मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या निवासस्थानी महत्त्वाची बैठक !

बिहार – बिहार निवडणुकीच्या निकालात भाजपला सर्वाधिक जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे राज्यात पहिल्यांदाच भाजप प्रथम क्रमांकाचा पक्ष बनला आहे. बिहारच्या सर्व 243 जागांपैकी एनडीए 126 जागांवर महाआघाडी 105 जागांवर आघाडीवर आहे. तर मतमोजणीचा कल पाहता, 110 जागांपैकी भाजपा 73 जागांवर आघाडीवर आहे. त्याचबरोबर जेडीयू 115 जागांपैकी 50 जागांवर आघाडीवर आहे. त्याशिवाय व्हीआयपी 5 आणि हिंदुस्तान अवाम मोर्चाचे प्रमुख जीतनराम मांझी एका जागेवर आघाडीवर आहेत. बिहार निवडणुकीचा हा ट्रेंड असाच कायम राहिला आणि बिहारमध्ये निम्म्यापेक्षा कमी जागा लढवून पहिल्यांदाच भाजप प्रथम क्रमांकाचा पक्ष बनणार असल्याचं दिसत आहे.यंदाच्या विधानसभा निवडणुकीत भाजपा 110 जागांपैकी 73 जागांवर आघाडीवर आहे, आरजेडी दुसर्‍या क्रमांकावर आहे. ते 67 जागांवर आघाडीवर आहेत. आरजेडीने 144 जागांसाठी उमेदवार उभे केले होते. त्याचबरोबर तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वात महाआघाडी 106 जागांवर आघाडीवर आहे.

दरम्यान सुरुवातीच्या कलांमध्ये राजदच्या नेतृत्वाखालील महागठबंधनने आघाडी घेतल्याचं चित्रं होतं, मात्र दुपारनंतर हे चित्रं पालटलं आणि एनडीएने सरशी घेतली. त्यामुळे पुन्हा एकदा बिहारमध्ये एनडीएचं सरकार येणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. भाजपने निवडणुकीत सर्वात मोठा पक्ष म्हणून आघाडी घेताच भाजप कार्यकर्त्यांनी कार्यालयाबाहेर जमून एकच जल्लोष सुरु केला. परंतु निवडणुकांचे निकाल स्पष्ट होण्यास रात्र होण्याची चिन्हं आहेत.
परंतु या निकालाचे कल पाहता बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या निवासस्थानी महत्वाची बैठक सुरु आहे, या बैठकीत सत्तास्थापनेच्या व्यूहरचनेची चर्चा सुरु असून उपमुख्यमंत्री सुशीलकुमार मोदी यांच्यासह भाजपचे मोठे स्थानिक नेते आणि डेडीयूचे नेते बैठकीत सहभागी आहेत.

एकूण जागा – 243

एनडीए – 126

महागठबंधन – 110

इतर – 12

———

महागठबंधन

आरजेडी – 73

काँग्रेस – 20

इतर – 17

एनडीए

जेडीयू – 45

भाजप – 74

व्हीआयपी – 04

इतर – 03

एक्झिट पोल्सच्या आकडेवारीनुसार बिहारमध्ये महागठबंधनचा दणदणीत विजय होऊन तेजस्वी यादव मुख्यमंत्रिपदी विराजमान होतील, असा अंदाज वर्तविण्यात आला होता. परंतु आता महागठबंधन पिछाडीवर असल्यामुळे तेजस्वी यादव याचं मुख्यमंत्रीपदाचं स्वप्न भंगणार असल्याचं दिसत आहे.

एक्झिट पोल्स

सर्व पोलचा एकत्रित अंदाज

एकूण जागा – 243

आरजेडी – काँग्रेस – 122

भाजप – जेडीयू – 112

इतर –    09

रिपब्लिकचा अंदाज

एकूण जागा – 243 जागा

आरजेडी – काँग्रेस – 91 ते 117

बीजेपी – जेडीयू -118 ते 138

इतर          – 5 ते 12

 

टीव्ही 9 चा अंदाज –

एकूण जागा – 243 जागा

आरजेडी – काँग्रेस – 115 ते 125

बीजेपी – जेडीयू – 110 ते 120

इतर          – 15 ते 20

C Voter चा अंदाज

एकूण जागा – 243

आरजेडी-काँग्रेस – 120

बीजेपी-जेडीयू – 116

इतर – 07

मागील निवडणुकीत म्हणजे 2015 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रीय जनता दल आणि जनता दल युनायटेड यांनी एकत्र निवडणूक लढवली होती. त्यावेळी राजद-जदयू महागठबंधनला 178 जागा मिळाल्या होत्या. राजदला 80, जनता दल युनायटेडला 71 आणि काँग्रेस पक्षाला 27 जागा मिळाल्या होत्या. तर उर्वरीत 58 जागा भाजप प्रणित एनडीएच्या वाट्याला आल्या होत्या.

COMMENTS