बिहारमध्ये आश्रमातील 34 मुलींवर बलात्कार झाल्याचं निष्पन्न, आरजेडीच्या आंदोलनात केजरीवाल, राहुल गांधींसह सर्व विरोधक एकवटले !

बिहारमध्ये आश्रमातील 34 मुलींवर बलात्कार झाल्याचं निष्पन्न, आरजेडीच्या आंदोलनात केजरीवाल, राहुल गांधींसह सर्व विरोधक एकवटले !

नवी दिल्ली – बिहारमधील मुलींच्या आश्रमातील 34 मुलींचे लैंगिक शोषण झाल्याच्या मुद्यावरुन सध्या राजकारण तापलं आहे. या प्रकरणातील दोषींवर नितीश कुमार यांनी तातडीने कारवाई करावी अशी मागणी विरोधकांनी केली आहे. दोषींवर कारवाई व्हावी यासाठी दिल्लीत जंतरमंतरवर राष्ट्रीय जनता दलाने धरणे आंदोलन आयोजित केले आहे. या धरणे आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी सर्व नितीशकुमार आणि नरेंद्र मोदी विरोधक एकवटले आहेत. डाव्या पक्षांच्या नेत्यांसह, आम आदमी पार्टीचे अध्यक्ष आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आंदोलकांची भेट घेत त्यांना पाठिंबा दिला. यावेळी राहुल गांधी यांनी नितीश कुमार आणि मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.

बिहारमधील मुलींच्या आश्रमातील तब्बल 34 मुलींवर बलात्कार झाल्याचं सिद्ध झालं आहे. सुप्रिम कोर्टानं या प्रकरणाची स्वतः दखल घेत बिहार सरकारला फटकारलं आहे. तसंच या प्रकरणी बिहार सरकारकडून उत्तर मागितलं आहे. दरम्यान या प्रकरणात मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या जवळचा सहकारी असल्यामुळे कारवाई होत ऩसल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. तर या प्रकरणावरुन आपण प्रचंड दुःखी झालो असून दोषींवर कठोर कारवाई करण्याचं आश्वासन नितीशकुमार यांनी दिलं आहे.

COMMENTS