राम कदम यांचे प्रवक्तेपद धोक्यात, वादग्रस्त विधानानंतर पक्षाकडून सूचना !

राम कदम यांचे प्रवक्तेपद धोक्यात, वादग्रस्त विधानानंतर पक्षाकडून सूचना !

मुंबई – महिलांबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर भाजपचे आमदार चांगलेच अडचणीत सापडले असल्याचं दिसत आहे. विरोधकांकडून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. यानंतर भाजपनंही आता सावधानतेची भूमिका घेतली असल्याचं दिसत आहे. राम कदम यांचे प्रवक्तेपद धोक्यात असून प्रवक्ता म्हणून कोणत्याही वाहिनीवर न जाण्याच्या सूचना पक्षानं राम कदम यांना दिल्या असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

दरम्यान पक्षानं दिलेल्या या सूचनांमुळे राम कदम यांना वादग्रस्त विधान भोवलं असल्याचं दिसत आहे. तसेच पक्षाची थेट बदनामी होत असल्याने राम कदम यांचं प्रवक्तेपद काढले जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याबाबत सध्या केवळ राम कदम यांना पक्षाकडून तोंडी सूचना दिल्या असल्याची माहिती आहे. त्यामुळे विरोधकांचा वाढता दबाव पाहता भाजपनं कदम यांच्यावर कारवाई करण्यास सुरुवात केली जात असल्याचं दिसत आहे.

 

COMMENTS