तामिळनाडूत लोकसभेसाठी अद्रमुक-भाजपमध्ये युती, भाजप ‘एवढ्या’ जागा लढवणार !

तामिळनाडूत लोकसभेसाठी अद्रमुक-भाजपमध्ये युती, भाजप ‘एवढ्या’ जागा लढवणार !

नवी दिल्ली – महाराष्ट्रात भाजपनं शिवसेनेसोबत युती केल्यानंतर आता तामिळनाडूतनही भाजपनं अद्रमुकसोबत युतीची घोषणा केली आहे. त्यामुळे याठिकाणी भाजपचं वजनं वाढलं असल्याचं दिसत आहे. पट्टली मक्कल काची (पीएमके) या पक्षालासोबत घेत अण्णा द्रमुकसोबतची (अद्रमुक) पारंपारिक युती भाजपनं-राखली आहे. यामध्ये तामिळनाडूत भाजपाच्या वाट्याला ५ लोकसभेच्या जागा आल्या आहेत. या युतीच्या चर्चेसाठी केंद्रीय मंत्री पीयूष गोयल आज चेन्नईत दाखल झाले होते. यावेळी युतीची घोषणा करण्यात आली आहे.

दरम्यान तामिळनाडूचे मुख्यमंत्री आणि अद्रमुकचे नेते ई. पलानीसामी आणि उपमुख्यमंत्री ओ. पनिरसेल्वम यांच्या नेतृत्वाखाली तामिळनाडूत निवडणूक लढवण्यात येणार आहे.तसेच केंद्रात मोदींच्या नेतृत्वाखील निवडणूक लढवली जाणार असल्याची घोषणाही यावेळी करण्यात आली आहे. या युतीमुळे पीएमकेला मोठा फायदा झाला असून त्यांना एकूण ३९ जागांपैकी ७ जागा देण्यात आल्या आहेत. तसेच विधानसभेच्या पोटनिवडणुकीत २१ जागांवर दिलेल्या पाठींब्याच्या बदल्यात पीएमकेला लोकसभेसाठी या ७ जागा देण्यात आल्या आहेत.

 

COMMENTS