मुंबई – आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी काही भाजप आमदारांसाठी धोक्याची घंटा वाजली असल्याची चर्चा आहे. कारण आगामी निवडणुकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे 40 ते 50 विद्यमान भाजप आमदारांचं तिकीट कापणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मुख्यमंत्री फडणवीस हे पक्षातील अकार्यक्षम आमदारांना घरचा रस्ता दाखवू शकतात, अशी माहिती आहे. या शक्यतेमुळे भाजपच्या नेत्यांची धाकधूक वाढली आहे. कोणाचं तिकीट कापलं जाणार आणि कोणाला संधी मिळणार याबाबतची चर्चा भाजपमध्ये वाढली असल्याचं बोललं जात आहे.
दरम्यान मागील विधानसभा निवडणुकीत शिवसेना, भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादीनं स्वतंत्र निवडणूक लढवली होती. यामध्ये भाजपला सर्वाधिक जागा मिळाल्या होता. परंतु आगामी निवडणुकीत मात्र शिवसेना, भाजपमध्ये युती होणार आहे. तसेच काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांची आघाडी होणार आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी हरवण्यासाठी भाजपला शिवसेनेसोबत जळवून घ्यावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर भाजपच्या वाट्यातील अनेक जागा शिवसेनेला दिल्या जाणार आहेत. त्यामुळे भाजपच्या 40 ते 50 विद्यमान आमदारांचं तिकीट कापलं जाणार असल्याची चर्चा आहे.
COMMENTS