भाजपचं आता मिशन विधानसभा, अजित पवारांच्या पराभवासाठी मोर्चेबांधणी ।

भाजपचं आता मिशन विधानसभा, अजित पवारांच्या पराभवासाठी मोर्चेबांधणी ।

मुंबई – राज्यातील 48 जागांवरील लोकसभा निवडणूक पार पडल्यानंतर सर्वच पक्षांनी विधानसभेच्या मोर्चेबांधणीसाठी सुरुवात केली आहे. भाजपकडूनही विधानसभेसाठी तयारी सुरु झाली असल्याचं दिसत आहे. विशेष म्हणजे ज्याप्रकारे लोकसभा निवडणुकीत भाजपनं बारामतीवर लक्ष्य केंद्रीत केलं होतं. त्याचप्रमाणे राज्यात राष्ट्रवादीला धक्का देण्यासाठी भाजपनं पुन्हा एकदा बारामतीवर लक्ष्य केंद्रीत करण्याचं ठरवलं आहे.

दरम्यान विधानसभा निवडणुकीत बारामती मतदारसंघात अजित पवारांना आव्हान देण्यासाठी भाजप नेते आणि महसूलमंत्री चंद्रकांत पाटील पुन्हा एकदा बारामतीत तळ ठोकणार आहेत. याआधी आम्ही बारामतीकडे संघटनाबांधणीकडे विशेष लक्ष दिलं नव्हतं, पण आता त्यात सुधारणा करणार, असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं असल्याची माहिती आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीप्रमाणेच आता विधानसभा निवडणुकीतही बारामती मतदारसंघ गाजणार असल्याचं दिसत आहे.

COMMENTS