मुंबई – लोकसभा निवडणुकीचा पहिला टप्पा पार पडल्यानंतर दुसरा टप्प्याचा प्रचार आज संपणार आहे. राजकीय नेत्यांनी एकमेकांवर जोरदार टीका टिपण्णी अधिक धारदार केली आहे. कुणी भाषणाच्या माध्यमातून तर कुणी सोशल मीडियाच्या माध्यमातून विरोधकांवर हल्लाबोल करत आहेत. मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार हे कुठे सभेत भाषण करताना पाहिले नसले तरी सोशल मीडियातून ते विरोधकांवर हल्ला करत आहेत. काँग्रेसमधील अनागोंदी आणि नाराजी नाट्यावर त्यांनी चारोळी करत सोशल मीडियात ती ट्वविटररुन ती व्हायरल केली आहे.
औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसमधील सावळा गोंधळ त्यांनी समोर आणला आहे. काँग्रेसचे बंडखोर आमदार अब्दुल सत्तार यांनी थेट पक्षाविरोधात भूमिका घेत औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार हर्षवर्धन जाधव यांना पाठिंबा दिला आहे. त्यामुळे काँग्रेसचे अधिकृत उमेदवार सुभाष झांबड यांची मोठी अडचण झाली आहे. ही टीका करत असताना शेलार यांनी हर्षवर्धन जाधव यांच्यावर हल्लाबोल केलाय. मुळात जाधव हे शिवसेनेचे आमदार होते हे शेलार बहुतेक विसरले असावेत. इंदापूरच्या हर्षवर्धन पाटील आणि अशोक चव्हाण यांच्यावरही शेलार यांनी टीका केली आहे.
"सत्तार"आळवत बसलेत नाराजीचा सूर
सातव मैदान सोडून गेलेत कुठेतरी दूर
हर्षवर्धन जाधवांचे सगळेच झालेय बेसूर
सूने सूने झालेय एका पाटलांना इंदापूर
नांदेडचे अशोकवन वाचवायला राष्ट्रीय अध्यक्षासह इंजिनाचा काळा धूर!
चौकीदारामुळे "कितने सपने हुए चुरचुर!"#ChowkidarकेSideEffects
— Chowkidar ashish shelar (@ShelarAshish) April 16, 2019
COMMENTS