राज्यसभेसाठी भाजपकडून एक नाव जाहीर, दोन नावं अजून गुलदस्त्यात !

राज्यसभेसाठी भाजपकडून एक नाव जाहीर, दोन नावं अजून गुलदस्त्यात !

मुंबई – 23 मार्चरोजी होणा-या राज्यसभेच्या निवडणुकीसाठी सर्वच पक्ष जोरदार तयारीला लागले आहे. देशभरातून 58 जागांसाठी ही निवडणूक घेण्यात येणार आहे. तर महाराष्ट्रातून 6 जागांवर ही निवडणूक पार पडणार आहे. या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी आणि शिवसेनेनं पूर्वीच्याच उमेदवारांना संधी देण्याचं ठरवलं आहे. तर काँग्रेसकडून काही नावांचा प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. भाजपनंही एका उमेदवाराचं नाव आज जाहीर केलं आहे. प्रकाश जावडेकर यांची राज्यसभा उमेदवारी महाराष्ट्रातून जाहीर करण्यात आली असून भाजप नेतृत्वानं पत्रक काढलं असून त्यामध्ये राज्यसभा निवडणुकीसाठी प्रकाश जावडेकरांचं नाव निश्चित करण्यात आलं आहे.

दरम्यान आणखी दोन नावं भाजपकडून निश्चित केली जाणार आहेत. तीन नावांचा प्रस्ताव पक्षाच्या राज्य निवड समितीनं पाठवला होता. त्यापैकी केंद्रीय समितीकडून जावडेकरांच्या नावावर शिक्कामोर्तब केलं आहे. तर धर्मेंद्र प्रधान आणि नारायण राणे या दोघांची नावं अजून गुलदस्त्यात आहेत. दरम्यान नारायण राणे यांना मंत्रिपदाऐवजी राज्यसभेवर पाठवण्याचा प्रस्ताव भाजपनं पाठवला आहे. परंतु भाजपचा हा प्रस्ता राणे यांनी अजून तरी मान्य केल्याचं दिसत नाही त्यामुळे नारायण राणे हे राज्यसभेवर जाणार की नाही हे मात्र अजून गुलदस्त्यात असून याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.

 

COMMENTS