बातमीचं शिर्षक वाचून तुम्ही गोंधळून गेला असाल ना ! हिमाचल प्रदेशमध्ये सध्या विधानसभा निवडणुकीचे जोरदार वारे सुरू आहे. काँग्रेस आणि भाजप या दोन मुख्य पक्षात लढत आहे. आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. भाजपमध्ये मुख्यमंत्रीपदाचे दावेदार अनेक आहेत. त्यामुळे भाजपनं मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जाहीर केला नव्हता. त्यामुळे काँग्रेसच्या नेत्यांनी भाजपचा मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार कोण ? असा प्रश्न करत करत भाजपला सतत डिवचण्याचा प्रय़त्न केला. शेवटी काल पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी प्रेमकुमार धुवल यांची मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार म्हणून घोषणा केली.
प्रेमकुमार धुमल हे 73 वर्षांचे आहेत. मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार म्हणून घोषणा झाल्यानंतर त्यांनी माध्यमांनी प्रतिक्रिया दिली. काँग्रेसच्या हायकमांडने धुल्हे की मांग की थी भाजपने धुल्हा दे दिया है या शब्दात त्यांनी काँग्रेसवर पलटवार केला. अर्थात काँग्रेसचे विद्यामान मुख्यमंत्रीही वयाच्याबाबतीत धुमल यांच्या पुढे आहेत. मुख्यमंत्री वीरभग्रसिंग हे तब्बल 83 वर्षांचे आहेत.
COMMENTS