पंढरपूर – काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याविरोधात विधानसभेसाठी भाजपनं उमेदवारी जाहीर केला आहे. याबाबतची घोषणा आज भाजपचे ज्येष्ठ नेते महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. दक्षिण कराडमधून विठ्ठल मंदिर समितीचे अध्यक्ष डॉ. अतुल भोसले यांना उमेदवारी देण्याची घोषणा चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.
दरम्यान भोसले यांचे काम पाहून त्यांना आणखी मोठी जबाबदारी देण्याचा विचार मुख्यमंत्री करत आहेत. यासाठी त्यांना प्रथम आमदार होणं गरजेचं आहे. त्यामुळे आगामी निवडणूकीसाठी त्यांना दक्षिण कराडमधून उमेदवारी देण्यात येणार असल्याचं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्यावतीने सुमारे 80 कोटी रुपये खर्च करुन बांधण्यात आलेल्या भक्तनिवासाचा आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत लोकार्पण सोहळा पार पडला.
यावेळी बोलताना चंद्रकांत पाटील यांनी डॉ.अतुल भोसले यांच्या कामाचे कौतुक करुन त्यांनी कराड दक्षिण मधून निवडणूकीसाठी तयारी सुरु करावी असं म्हटलं आहे. त्यामुळे दक्षिण कराडमधून आगामी विधानसभा निवडणुकीत चव्हाण विरुद्ध भोसले असाच सामना पहायला मिळणार आहे.
COMMENTS