पनवेल – भाजप नगरसेवकाची गुंडगिरी समोर आली असून मनसे कार्यकर्त्यांना मारहाण करण्यात आली आहे. पनवेल महापालिकेतील भाजप नगरसेवक विजय चिपळेकर यांनी मनसे कार्यकर्ते प्रशांत जाधव यांच्यावर जीवघेणा हल्ला केला आहे. ही घटना 29 एप्रिल रोजी मध्यरात्री 12 वाजता घडलेली आहे. या घटनेचा व्हिडीओ सीसीटीव्हीत कैद झाला आहे. पनवेल मनपा निवडणुकीत नगरसेवक विजय चिपळेकर यांच्या कार्यकर्त्यांना पैसे वाटताना पकडण्यात आले होते. मनसे कार्यकर्ता प्रशांत जाधव यांनी आपले पैसे पकडून दिल्याच्या रागातून हा हल्ला करण्यात आल्याचं समजतं.
दरम्यान या हल्ल्यानंतर विजय चिपळेकर आणि त्यांचे गुंड साथीदार फरार झाले असून प्रशांत जाधव गंभीर जखमी झाले आहेत. कामोठे पोलिस स्टेशनमध्ये मारहाण करणाऱ्या भाजप नगरसेवकासह नऊ जणांवर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. याबाबतचा अधिक तपास पोलीस करत आहेत.
COMMENTS