नवी दिल्ली – भाजपच्या एका नगरसेवकाची गुंडागर्दी समोर आली आहे. या नगरसेवकानं एका पोलिसाला बेदम मारहाण केली आहे. उत्तर प्रदेशातील मेरठमध्ये हा प्रकार घडला असून मारहाणीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. मुनिष कुमार असं या भाजपा नगरसेवकाचं नाव असून त्याला अटक करण्यात आली आहे.
एका हॉटेलमध्ये ही मारहाण करण्यात आली असून मुनिष कुमार स्वत: या हॉटेलचा मालक असल्याची माहिती आहे. संबंधित पोलीस अधिकारी आणि एक महिला वकील या हॉटेलमध्ये आले होते. यावेळी ऑर्डर वेळेवर न आल्याने महिला वेटरशी भांडत होती. याच कारणातून मुनिष कुमार यांचं भांडण झालं आणि त्यांनी पोलीस अधिकाऱ्यावर हात उचलला असल्याची माहिती आहे. या घटनेचा देशभरातून निषेध केला जात असून भाजपवर जोरदार टीका केली जात आहे.
COMMENTS