नवी मुंबई : नवी मुंबईत शिवसेनेनंतर राष्ट्रवादीनेही भाजपला धक्का दिला आहे. राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे यांच्या मध्यस्थीने भाजप नगरसेविकेसह माजी नगरसेवकाने राष्ट्रवादीचे घड्याळ हाती घेतले आहे. त्यामुळे भाजपचे नेते गणेश नाईक यांनाही धक्का दिल्याचे बोलले जात आहे
राष्ट्रवादीचे तत्कालीन नेते गणेश नाईक यांच्यासह माजी नगरसेवक वैभव गायकवाडांनी भाजप प्रवेश केला होता. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये गळती सुरुच आहे. विशेष म्हणजे गणेश नाईक यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे. गेल्या आठवड्यातच नाईक समर्थक असलेले भाजपचे तीन नगरसेवक शिवसेनेत दाखल झाले होते.
नवीन गवते , दीपा गवते आणि अपर्णा गवते या नगरसेवकांनी गेल्याच आठवड्यात भाजपला सोडसिठ्ठी देत हाती शिवबंधन बांधलं होतं. आता भाजपच्या नगरसेविका दिव्या गायकवाड व माजी नगरसेवक वैभव गायकवाड यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. यावेळी आमदार शशिकांत शिंदेही उपस्थित होते.
COMMENTS