रिक्षा चालक ते पिंपरी-चिंचवडचे महापौर, राहुल जाधव यांचा राजकीय प्रवास !

रिक्षा चालक ते पिंपरी-चिंचवडचे महापौर, राहुल जाधव यांचा राजकीय प्रवास !

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या महापौरपदी राहुल जांधव यांची निवड झाली आहे. महापौरपदाच्या निवडणुकीत भाजपचे राहुल जाधव यांना ८० मते तर, राष्ट्रवादीचे विनोद नढे यांना  ३३  मते मिळाली आहेत. सत्ताधारी भाजप व  राष्ट्रवादीचे  प्रत्येकी ३ नगरसेवक अनुपस्थित राहिले. तर, पाच अपक्ष नगरसेवक आणि मनसेचे सचिन चिखले यांनी भाजपला मतदान केले. यावेळी शिवसेनेने तटस्थ भूमिका घेतली आहे.

 राहुल जाधव यांचा राजकीय प्रवास

महापौरपदी निवड झालेले जाधव हे मागील टर्मला मनसेचे नगरसेवक होते. यावेळी त्यांनी पालिका निवडणुकीपूर्वी भाजपात प्रवेश केला होता. जाधववाडी प्रभाग क्र 2 मधून ते निवडून आले आहेत.अत्यंत गरीब कुटुंबात जन्मलेल्या जाधव यांनी शेती परवडत नसल्याने दहावी होताच आपल्या कुटुंबियांच्या उदरनिर्वाहासाठी पिंपरी चिंचवड शहरात तब्बल 5 वर्षे रिक्षा चालवली आहे. त्यानंतर 2006ला मनसेसोबत काम करण्यास सुरूवात केली. 2012ला ते मनसेचे नगरसेवक म्हणून निवडून आले. मात्र, 2017 च्या पालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी त्यांनी मनसेला रामराम ठोकत भाजपमध्ये प्रवेश केला आणि गेल्यावर्षी ते भाजपमधून निवडून आले. त्यानंतर त्यांना लगेच महापौर होण्याची संधी मिळाली आहे. त्यांच्या या प्रेरणादायी प्रवासाचं राजकीय वर्तुळात कौतुक केलं जात आहे.

 

 

COMMENTS