पिंपरी-चिंचवड – महापालिकेत भाजपचा अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला असून भाजपच्या नगरसेविका अश्विनी बोबडे यांनी सदस्यत्वाचा तडकाफडकी राजीनामा दिला आहे. भाजपच्या निष्ठावान नगरसेवकांना पात्रता असतानाही डावलले जात आहे. त्याउलट आयारामांना महत्त्वाची पदे दिली जात आहेत. मी विधी समिती मागितली असताना मला क्रीडा समिती दिली असल्याचा आरोप करत भाजपच्या नगरसेविका अश्विनी बोबडे यांनी नियुक्ती होताच पाच मिनिटाच्या आत सदस्यत्वाचा तडकाफडकी राजीनामा दिला आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या विविध विषय समितीच्या सदस्यांची निवड करण्यात आली आहे. त्या मध्येबोबडे यांची क्रीडा समितीत निवड करण्यात आली होती. परंतु पाच मिनिटांतच बोबडे यांनी तडकाफडकी राजीनामा दिला आहे. मी पात्र असुनही मला डावलले जात आहे. पक्ष सोडून आलेल्या आयारामांना महत्त्वाची पदे दिली जातात. निष्ठावान नगरसेवकाना डावलले जात आहे. मी 1992 पासून भाजपचे काम करत आहे असं म्हणत अश्विनी बोबडे यांनी क्रीडा समिती सदस्यत्वाचा तडकाफडकी राजीनामा दिला आहे.
COMMENTS