भाजपमधील ‘हे’ दलित खासदार पक्ष सोडण्याच्या तयारीत ?

भाजपमधील ‘हे’ दलित खासदार पक्ष सोडण्याच्या तयारीत ?

नवी दिल्ली – आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपमध्ये मोठे फेरबदल केले जाणार असल्याची जोरदार चर्चा रंगली आहे. या फेरबदलात देशातील अनेक खासदारांचं तिकीट कापलं जाणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. यामध्ये दलित खासदारांची जास्तीत जास्त तिकीटं कापली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे या दलित खासदारांनी आधीच वेगवेगळे पक्ष चाचपण्यास सुरुवात केली आहे. असून याबाबतची बातमी जनसत्ता या हिंदी वृत्तपत्राने दिली आहे.

दरम्यान भाजपच्या खासदार सावित्री बाई फुले, छोटेलाल खरवार, अशोक दोहरे, यशवंत सिंह यांची नावं कापली जाण्याची शक्यता अधिक असल्याची माहिती आहे. त्यामुळे यातील काही खासदार हे बसपाच्या संपर्कात असल्याची माहिती आहे. उत्तर प्रदेशात मागील निवडणुकीत भाजपचे सर्वात जास्त खासधार निवडून आले होते. ८० पैकी ७१ जागांवर भाजपचे खासदार निवडून आले आहेत. त्यापैकी १७ खासदार हे दलित असून त्यापैकी काही खासदार हे पक्ष सोडण्याची तयारीत असल्याची माहिती आहे.

COMMENTS