भाजपकडून 6 वा उमेदवारानं डमी म्हणून अर्ज भरला, “या” नेत्यानं भरला डमी अर्ज !

भाजपकडून 6 वा उमेदवारानं डमी म्हणून अर्ज भरला, “या” नेत्यानं भरला डमी अर्ज !

विधान परिषदेच परिषदेच्या निवडणुकीत घोडाबाजार होऊ नये यासाठी सर्वच पक्ष काळजी घेत आहेत. त्यामुळे प्रत्येक पक्षाकडून आपली जेवढी ताकद तेवढेच उमेदवार उभे केले जात आहेत. भाजपचेही 5 उमेदवार निवडूण येऊ शकतात. त्यामुळे काल त्यांनी पाच उमेदवार देण्याचा निर्णय घेतला होता. आता मात्र भाजपकडून सहावा उमेदवारही अर्ज भरणार आहे. भाजपचे सांगली जिल्हा अध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांनी भाजपकडून डमी उमेदवार म्हणून अर्ज भरला आहे.

विधान परिषदेच्या 11 जागांसाठी ही निवडणूक होत आहे. त्यामुळे काँग्रेसचे 2, राष्ट्रवादीचा 1, शिवसेनेचे 2 आणि भाजपचे 5 उमेदवार सहज निवडूण येऊ शकतात. प्रत्येक पक्षाची थोडी मते शिल्लक राहतात. त्यामुळे 11 वा उमेदवार कोण याची चर्चा सुरू आहे. शेकापचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील हे 11 वा उमेदवार म्हणून रिंगणात उतरले आहेत. मात्र आता भाजपने डमी उमेदवार म्हणून देशमुखांना रिंगणात उतरवल्यामुळे त्यांनी अर्ज कायम ठेवल्यास निवडणुकीत पुन्हा घोडेबाजार होण्याची शक्यता आहे.

COMMENTS