भाजपच्या उपमहापौरांची जीभ घसरली, शिवाजी महाराजांबद्दल वापरले अपशब्द !

भाजपच्या उपमहापौरांची जीभ घसरली, शिवाजी महाराजांबद्दल वापरले अपशब्द !

अहमदनगर – नगर महापालिकेचे भाजपचे उपमहापौर श्रीपाद छिंदम यांच्याकडून बांधकाम विभागातील कर्मचारी अशोक बिडवे यास अपशब्द वापरल्याची ऑडियो क्लिप व्हायरल झाली आहे. श्रीपाद छिंदम यांनी त्यांच्या प्रभागात काम करण्यासाठी पालिकेकडे कर्मचारी मागितले होते. संबंधित कर्मचाऱ्याने तुम्हाला तुमचे काम करून देतो, मी नाही म्हणालेलो नाही पण शिवजयंती होऊ दिली तर बरं होईल, अशी विनंती केली. त्यामुळे सत्तेत आणि उपमहापौरपदावर असलेल्या छिंदम यांना राग अनावर झाला. कर्मचाऱ्यावर आपला रोख झाडताना त्यांची जीभ घसरली आणि त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल व शिवजयंतीबद्दल अत्यंत घाणेरडी भाषा वापरली तू मला शिकवणारा कोण आहे? तू दुपारी मला पालिका कार्यालयात भेटायला ये, असा दम दिला. या संभाषणाची क्लिप व्हायरल झाली आहे. संबंधित कर्मचाऱ्याने यूनियनकडे तक्रार केली असून गंभीर दखल घेतली आहे.

दरम्यान, ‘छत्रपती का आशीर्वाद, चलो चले भाजपके साथ’ ही घोषणा म्हणजे जुमलाच होता. भाजपचे खरे रुप आता समोर आले आहे, अशा संतप्त शब्दात प्रतिक्रिया आता सोशल मीडियावर व्यक्त होऊ लागल्या आहेत.

COMMENTS