मुंबई – भाजपची महाराष्ट्र कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. या यादीत माझ्याबरोबर 12 प्रदेश उपाध्यक्ष आहेत. 5 सेक्रेटरी म्हणजेच सरचिटणीस आहेत. या व्यतिरिक्त एक महामंत्री संघटन म्हणजे सरचिटणीस संघटण असे 6 सरचिटणील आहेत. 1 कोषाध्यक्ष व्यतिरिक्त 12 सरचिटणीस असल्याची माहिती पाटील यांनी दिली आहे. नागपूरचे माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे महामंत्री आहेत. आमदार देवयानी फरांदे, माजी मंत्री रविंद्र चव्हाण, श्रीकांत भारती महामंत्री आहेत. विजय पुराणिक महामंत्री संघटक आहेत असंही ते म्हणालेत.
या प्रमुख कार्यकारणीत माझ्यासोबत 12 प्रदेश उपाध्यक्ष, 12 सेक्रेटरी, 6 जनरल सेक्रेटरी आणि 1 कोषाध्यक्ष आहेत. याशिवाय 7 प्रमुख मोर्चे असतात. त्याचे अध्यक्षही आम्ही घोषित करतो. या व्यतिरिक्त 18 प्रकोष्ठ म्हणजे वेगवेगळ्या विषयांचे प्रमुख घोषित करत आहोत. प्रदेशाचे कार्यालय, मीडिया, सोशल मीडिया या सर्वांचे प्रमुख आम्ही घोषित करत आहोत. कार्यकारणी सदस्य 69 असतील. निमंत्रित सदस्य 139 जण असतील. सर्व आमदार-खासदार कायम सदस्य असतात. राज्याच्या सर्व सामाजिक स्तर आणि भौगोलिक क्षेत्रांना न्याय देण्यासाठी या कार्यकारणीचा उपयोग होईल असंही पाटील यांनी म्हटलं आहे.
माजी मंत्री पंकजा मुंडे यांना प्रदेश कार्यकारिणीत स्थान मिळालेलं नसून त्यांना केंद्राच्या कार्यकारिणीत महत्त्वाची जबाबदारी दिली जाणार असल्याचं भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. मात्र त्यांच्याऐवजी खासदार प्रीतम मुंडे यांना राज्य कार्यकारिणीमध्ये स्थान देण्यात आलं आहे.
भाजपची कार्यकारिणी यादी
महामंत्री – सुजित सिंह ठाकूर, चंद्रशेखर बावनकुळे, श्रीकांत भारतीय, विजय पुराणिक, देवयानी फरांदे, रवींद्र चव्हाण,
उपाध्यक्ष – माजी मंत्री राम शिंदे, जयकुमार रावल, खासदार प्रीतम मुंडे, आमदार प्रसाद लाड, चित्रा वाघ, माधवी नाईक, खासदार कपिल पाटील, खासदार भारती पवार, जयप्रकाश ठाकुर,
संजय कुटे, माधव भंडारी, माजी आमदार सुरेश हळवणकर असे 12 उपाध्यक्ष आहेत.
COMMENTS