माजी जलसंपदामंत्री गिरीश महाजन अडचणीत?, 5 हजार कोटींच्या प्रकल्पांचा सरकार आढावा घेणार!

माजी जलसंपदामंत्री गिरीश महाजन अडचणीत?, 5 हजार कोटींच्या प्रकल्पांचा सरकार आढावा घेणार!

मुंबई – सत्तेत आल्यानंर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फडणवीस सरकारच्या प्रकल्पांचा आढावा घ्यायला सुरुवात केली आहे. त्यामुळे भाजपचे नेते आणि माजी जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. कारण महाजन हे जलसंपदामंत्री असताना सरकारच्या शेवटच्या काळात जे जलसिंचन प्रकल्प मंजूर झाले त्यांचा नवं सरकार आढावा घेण्याची शक्यता आहे. हे सर्व चार प्रकल्प जळगाव जिल्ह्यातले असून त्यासाठी 5 हजार कोटी रुपये मंजूर करण्यात आले होते. मात्र हा निर्णय घेताना नियमांचं पालन करण्यात आलेलं नसल्याचं बोललं जात आहे. याचाच आढावा हे सरकार घेणार आहे.

दरम्यान सरकारच्या या निर्णयाला गिरीश महाजन यांनी आव्हान दिलं आहे. सिंचन प्रकल्पांमध्ये एक रुपयाचाही भ्रष्टाचार झालेला नाही. सरकारने हवी ती चौकशी करावी मात्र कामं थांबवू नयेत अस गिरीश महाजन म्हणाले आहेत. परंतु कुठलेही प्रकल्प थांबविण्यात येणार नाहीत मात्र अनावश्यक खर्च थांबविणार असल्याचं मुख्यमंत्री ठाकरे यांनी म्हटलं आहे. तर सर्व प्रकल्पांचा आढावा घेऊन अग्रक्रम ठरविण्यात येणार असल्याचंही सरकारने म्हटलं आहे.

COMMENTS