भाजपकडून अजित पवारांविरोधात गोपिचंद पडळकर यांना उमेदवारी!

भाजपकडून अजित पवारांविरोधात गोपिचंद पडळकर यांना उमेदवारी!

मुंबई – वंचित बहुजन आघाडीला रामराम ठोकल्यानंतर गोपीचंद पडळकर यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला आहे. मुंबईतील गरवारे क्लबमध्ये पार पडलेल्या कार्यक्रमात, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत पडळकरांनी भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी गोपीचंद पडळकरांना बारामतीची उमेदवारी घोषित केली आहे. त्यामुळे बारामतीतून गोपीचंद पडळकर विरुद्ध अजित पवार असा सामना रंगणार असल्याचं दिसत आहे.

दरम्यान बारामती मतदारसंघात धनगर समाजातील मतदारसंख्या अधिक आहे. त्यामुळे धनगर समाजाचे नेते गोपीचंद पडळकर यांना भाजपनं उमेदवार दिली असल्याची चर्चा आहे. पडळकर लोकसभा निवडणुकीतही सांगली मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. त्यावेळी खानापूर आणि जत मतदारसंघात पडळकर यांना जास्त मतदान झालं होतं. त्यामुळे पडळकर यांना जतमधून उमेदवारी दिली जाऊ शकते अशी चर्चा होती. परंतु राष्ट्रवादीला धक्का देण्यासाठी त्यांना बारामतीतून मुख्यमंत्र्यांनी उमेदवारी दिली असल्याचं बोलं जात आहे.

COMMENTS