भाजपकडून अत्यंत खालच्या पातळीची टीका, नेहरु स्त्रिलंपट होते हे सिद्ध करण्यासाठी चक्क बहिण विजयालक्ष्मींसोबतचा फोटो आयटी सेलने केला ट्विट !

भाजपकडून अत्यंत खालच्या पातळीची टीका, नेहरु स्त्रिलंपट होते हे सिद्ध करण्यासाठी चक्क बहिण विजयालक्ष्मींसोबतचा फोटो आयटी सेलने केला ट्विट !

भाजपच्या आयटी सेलने पुन्हा एकदा विरोधकांवर टीका करताना पातळी सोडल्याचं दिसून येतंय. भाजपच्या आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी एक ट्विट केलं आहे. त्यात त्यांनी पातळीसोडून नेहरुंवर टीका केली आहे. गुजरातमधील पाटीदार समाजाचा नेता हार्दिक पटेल हा स्त्रिलंपट आहे. पंडित नेहरुही स्त्रिलंपट होते हे त्यांनी ट्विटमधून सांगण्याचा प्रयत्न केलाय. ट्विट करतना मालवीय यांनी काही फोटोही त्यासोबत ट्विट केले आहेत. पंडित नेहरु काही महिलांना अलिंगन देतानाचे फोटो ट्विट केले आहेत. त्यातील दोन फोटो हे तर चक्क नेहरु आणि त्यांची बहिण विजयालक्ष्मी पंडित हे एकमेकांना अलिंगन देतानाचे आहेत. तर दोन फोटोमध्ये नेहरुंची भाची मृनिलिनी सेहगल यांच्यासोबतचे फोटो आहेत.

गुजरातमधील पाटीदार समाजाचा नेता हार्दिक पटेल यांची कथीत सेक्स सीडी सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. त्यात काँग्रेसच्या एका नेत्याने वेगळ्या संदर्भात हार्दिक पटेलमध्ये सरदार वल्लभाई पटेल यांचे डीएनए असल्याचं वक्तव्य केलं होतं. त्यावर उत्तर म्हणून मालविय यांनी सरकार पटेल आणि हार्दिक पटेल यांचे डीएनए सारखे नाहीत तर हार्दिक पटेल आणि नेहरुंचे डीएनए सारखे असल्याचं म्हटलं आहे. न्यूज 18 आणि आऊटलूक इंडिया यांनी हे वृत्त दिलं आहे. अमित मालवीय यांच्या या ट्विटवर चौफेर टीका होत आहे. आता भाजप यावर काय प्रतिक्रिया देतं ते पहावं लागेल.

https://twitter.com/malviyamit/status/930807583136415744

COMMENTS