खंडणी मागितल्याप्रकरणी ठाण्यातील भाजप नेत्याला अटक !

खंडणी मागितल्याप्रकरणी ठाण्यातील भाजप नेत्याला अटक !

ठाणे -खंडणी मागितल्याप्रकरणी ठाण्यातील भाजप नेत्याला अटक करण्यात आली आहे. माजी नगरसेवक आणि सध्या भाजपवासी असलेले सुधीर बर्गे यांना अटक करण्यात आली असून ठाणे गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने ही कारवाई केली आहे. सुप्रसिध्द हिरानंदानी बिल्डर यांच्याकडे खंडणीसाठी बर्गे यांनी तगादा लावल्याचा आरोप करण्यात आला आहे.

सुधीर बर्गे

दरम्यान २००७ साली ठाण्याच्या लोकमान्य नगर येथून राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकीटावर बर्गे निवडून आले होते. तर गेल्या वर्षी झालेल्या पालिका निवडणुकीत त्यांच्या पत्नीने भाजपच्या तिकीटावर निवडणूक लढवली होती.तसेच ठाणे खंडणी विभागाने आरटीआय कार्यकर्त्याच्या नावाखाली खंडणी मागणाऱ्या सुधीर बर्गेसह शौकीत मुलांनी आणि आरिफ इलाकी यांना अटक केली आहे.

COMMENTS