महिला पोलीस अधिका-याविरोधात वादग्रस्त पोस्ट, भाजप नेत्याला पोलिसांची जबर मारहाण ?

महिला पोलीस अधिका-याविरोधात वादग्रस्त पोस्ट, भाजप नेत्याला पोलिसांची जबर मारहाण ?

उत्तर प्रदेश – महिला पोलीस अधिका-याविरोधात फेसबुकवर वादग्रस्त पोस्ट करण भाजपच्या एका नेत्याला चांगलच महागात पडलं आहे.  उत्तर प्रदेशातील बांदा येथील भाजपचे विभाग प्रमुख ब्रजेश त्रिपाठी यांनी महिला एसपी शालिनी यांच्याविरोधात वादग्रस्त पोस्ट केली होती. त्यानंतर पोलिसांनी आयटी ऍक्टनुसार त्यांच्यावर कारवाई केली. याविरोधात भाजपचे हजारो कार्यकर्ते आज रस्त्यावर उतरले होते.

दरम्यान विभाग प्रमुख ब्रजेश त्रिपाठी यांनी पोलिसांवर गंभीर आरोप केले असून बुधवारी रात्री माझ्या घरी साध्या कपड्यावर पोलीस आले. त्यानंतर या पोलिसांनी मला मारहाण करत अज्ञात ठिकाणी घेऊन गेले. व त्याठिकाणी त्यांनी मला जबर मारहाण केली. तसेच मला जिवे मारुन टाकण्याची पोलिसांची योजना होती. असाही आरोप ब्रजेश यांनी केला आहे. तसेच एसपी शालिनी यांच्याविरोधात त्यांनी तक्रार देखील दाखल केली आहे.

 

 

 

COMMENTS