आंदोलकांच्या खरेदीसाठी भाजपचं 500 कोटींचं बजेट – हार्दिक पटेल

आंदोलकांच्या खरेदीसाठी भाजपचं 500 कोटींचं बजेट – हार्दिक पटेल

अहमदाबाद – आंदोलकांना विकत घेण्यासाठी भाजपनं 500 कोटी रुपयांचं बजेट निश्चित केलं आहे, असा गंभीर आरोप पाटीदार आंदोलनाचा नेता हार्दिक पटेल यानं केला आहे.

भाजप प्रवेशासाठी एक कोटी रुपयांची ऑफर दिल्याचा आरोप गुजरातमधील पाटीदार आंदोलनाचे नेते नरेंद्र पटेल यांनी केला होता. भाजपनं दिलेली 10 लाखांची रोकडही पत्रकार परिषदेत सर्वांसमोर ठेवून त्यांनी खळबळच उडवून दिली होती. टोकन म्हणून ही रक्कम दिली असून दुसऱ्या दिवशी होणाऱ्या भाजपच्या कार्यक्रमात जाहीर प्रवेशावेळी उर्वरित 90 लाख रूपये देऊ, असं सांगितल्याचा दावाही त्यांनी केला होता. या ‘मनी ऑफर’ प्रकरणावरून सर्वच विरोधकांनी भाजपला घेरलं आहे. सत्ताधाऱ्यांविरोधात लढणाऱ्या आंदोलकांना विकत घेण्यासाठी भाजपकडं ५०० कोटी रुपयांचं बजेट आहे, असा गंभीर आरोप हार्दिक पटेलनं केला आहे. भाजपनं गुजरातमध्ये विकास केला असेल तर आंदोलकांना पैसे देऊन विकत का घेत आहात हेच समजत नाही, असंही ते म्हणाले.

भाजप विकत घेईल इतकी गुजरातची जनता स्वस्त नाही. भाजपकडून जनतेचा अपमान केला जात आहे. त्याचा बदला गुजरातची जनता नक्कीच घेईल, असंही तो म्हणाला. भाजपशी मी एकटा नव्हे तर गुजरातचे 6 कोटी लोक लढत आहेत. व्यापारी, शेतकरी, सर्व समाज आणि मजूर भाजपच्या हुकूमशाहीला वैतागले आहेत, असंही त्यानं सांगितलं.

COMMENTS