भाजपला धक्का बसणार? उमेदवारी न दिल्यामुळे ‘या’ नेत्यानं बोलावली बैठक!

भाजपला धक्का बसणार? उमेदवारी न दिल्यामुळे ‘या’ नेत्यानं बोलावली बैठक!

नवी मुंबई – राष्ट्रवादीतून भाजपात गेलेले नवी मुंबईतील नेते गणेश नाईक यांना धक्का बसला आहे. भाजपने काल विधानसभेसाठी पहिल्या 125 उमेदवारांची यादी जाहीर केली. यामध्ये गणेश नाईक यांच्या जागी बेलापूर मतदारसंघातून आमदार मंदा म्हात्रे यांना उमेदवारी जाहीर करण्याता आली आहे. तर नवी मुंबईतील ऐरोली आणि बेलापूर हे दोन्ही मतदार संघ भाजपला देण्यात आले आहेत.

यानुसार ऐरोली मतदार संघातून गणेश नाईक यांचे पुत्र संजीव नाईक यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर बेलापूर मतदार संघातून गणेश नाईक यांना उमेदवारी देण्यात येणार असल्याची चर्चा होती. परंतु शेवटच्या क्षणी मंदा म्हात्रे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे कुटुंबातल्या इतर सदस्यांसह राष्ट्रवादीच्या 48 नगरसेवकांसोबत भाजपमध्ये गेलेल्या गणेश नाईक यांना धक्का बसला आहे.

या पार्श्वभूमीवर गणेश नाईकांनी महापालिका नगरसेवकांची बैठक बोलावली आहे. 12:30 वा. महापौर बंगल्यावर त्यांनी बैठक बोलावली असून भाजप, राष्ट्रवादी आणि अपक्ष अशा 56 नगरसेवकांना बोलावलं आहे. बैठकीला संदीप आणि संजीव नाईक उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे बैठकीत कोणता निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

COMMENTS