नवी दिल्ली – काँग्रेस नेत्यावर टीका करताना एका भाजप नेत्यानं बेताल वक्तव्य केलं आहे. जम्मू – काश्मीरमधील पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्याला ‘दुर्घटना’ म्हणणारे काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांच्या बोटाला आणि तोंडाला गुप्तरोग झाला असून भारताविरोधात विधान केल्याशिवाय त्यांना जेवण जात नसल्याची टीका
मध्य प्रदेशमधील भाजपा नेते गोपाल भार्गव यांनी दिग्विजय सिंह यांच्यावर केली आहे. काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांच्या बोटाला आणि तोंडाला गुप्तरोग झाला असल्याचं बेताल वक्तव्य त्यांनी केलं आहे.
BJP's Gopal Bharghav on Digvijay Singh calling Pulwama attack an 'accident':Unki ungliyon aur munh mein ek guptrog hai. Jab tak wo apni ungliya nahin chala lete mobile pe, jab tak apne munh se kuch desh ke khilaf bayan nahi de dete,tab tak Digvijay Singh ko bhojan nasib nahi hota pic.twitter.com/h0QXkmvJkg
— ANI (@ANI) March 8, 2019
दरम्यान दिग्विजय सिंह यांनी काही दिवसांपूर्वी एकापाठोपाठ एक टि्वट करुन नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल करताना पुलवामा दहशतवादी हल्ल्याला दुर्घटना ठरवले होते. पुलवामा दुर्घटनेनंतर भारतीय हवाई दलाने केलेल्या एअर स्ट्राइकवर परदेशी प्रसारमाध्यमे शंका घेत आहेत. ज्यामुळे भारत सरकारच्या विश्वसनीयतेबद्दलही प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे, असे त्यांनी म्हटले होते. त्यावर गोपाल भार्गव यांनी दिग्विजय सिंह यांच्यावर टीका केली आहे.काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांच्या बोटाला आणि तोंडाला गुप्तरोग झाला असल्याचं बेताल वक्तव्य त्यांनी केलं आहे.
COMMENTS