मुंबई – आजचा पावसाळी अधिवेशनाचा तिसरा दिवस आहे. या अधिवेशनादरम्यान विविध मुद्द्यांवरुन विरोधक सरकारला घेरण्याचा प्रयत्न करत आहेत. विरोधकांबरोबरच पक्षावर नाराज असलेले भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे देखील आज आक्रमक झाले असल्याचं पहावयास मिळाले आहे.
विधानसभेचे कामकाज सुरू होताच प्रश्नोत्तरांच्या तासात विरोधकांपेक्षा आमदार एकनाथ खडसे यांनी सरकारवर प्रश्नांची सरबत्ती केली. सौर पंपांच्या विषयानंतर त्यांनी आदिवासी भागातील कुपोषणाच्या विषयावर मंत्र्यांना धारेवर धरले. कुपोषणाचे सर्वाधिक बळी युती शासनाच्या काळातच गेल्याचा आरोप खडसेंनी केला आहे.
दरम्यान, आज सकाळी विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांनी सरकार विरोधात घोषणाबाजी केली. एकनाथ खडसे विधिमंडळाच्या पायऱ्याजवळ येताना दिसताच त्यांनी ‘निष्ठावंतांवर अन्याय करणाऱ्या सरकारचा धिक्कार असो’, अशा घोषणा दिल्या. त्यानंतर कामकाज सुरु होताच खडसे यांनी आक्रमक पवित्रा घेतला. आदिवासी भागातील कुपोषणाच्या विषयावर मंत्र्यांना
त्यांनी धारेवर धरले. एवढेच नाही तर कुपोषणाचे सर्वाधिक बळी युती शासनाच्या काळातच गेल्याचा आरोप खडसेंनी केला आहे.
COMMENTS