नवी दिल्ली – हत्तीवरुन काढलेली मिरवणूक एका विधानसभा अध्यक्षांना चांगलीच महागात पडली आहे. मिरवणुकीत हत्ती बिथरल्याने उपसभापती खाली कोसळले आहेत. सुदैवानं त्यांना कुठलीही दुखापत झाली नाही. ही घटना घडलीय आसामच्या करीमगंज जिल्ह्यात घडली आहे. भाजपचे आमदार कृपानाथ मल्ला यांची विधानसभेच्या उपसभापती निवड करण्यात आली आहे. त्यानिमित्त त्यांच्या समर्थकांनी हत्तीवरुन त्यांची मिरवणूक काढण्याचं ठरवलं होतं. परंतु हत्तीवर बसताच हत्ती बिथरल्याने कृपानाथ हे हत्तीवरुन खाली कोसळले असल्याचा व्हिडीओ व्हायरलं झाला आहे.
दरम्यान मल्ला हे रातबारी या विधानसभा मतदार संघाचे आमदार आहेत. रातबारीच्या भाजप कार्यकर्त्यांनी मिरवणुकीसाठी हत्तीला सजवून त्यावर मल्ला बसले आणि मिरवणूक सुरू झाली.गर्दी आणि घोषणांमुळं हत्ती बिथरला. माहुताला तो ताब्यात ठेवणं शक्य होत नव्हतं. हत्ती वेगानं धावायला लागला आणि उपसभापती कृपानाथ मल्ला हत्तीवरून खाली कोसळले. त्यानंतर लगेचच त्यांच्याकडे कार्यकर्त्यांनी धाव घेतली.
COMMENTS