नवी दिल्ली – गेली काही दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये भरमसाठ वाढ होत आहे. त्यामुळे सामान्य माणसाचं कंबरडं मोडलं आहे. याविरोधात विरोधकांनीही आक्रमक भूमिका घेतली आहे. काही दिवसांपूर्वीच काँग्रेसनं भाजप सरकारविरोधात भारत बंदची हाक दिली होती. तरीही इंधनाच्या दरांमध्ये होत असलेली वाढ चालूच आहे. या वाढत्या दरवाढीमुळे सामान्य नागरिकांचे हाल होत आहे. तामिळनाडूमध्ये या वाढत्या दरवाढीबाबत एका रिक्षा चालकानं भाजप नेत्याला प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केला. यावेळी या रिक्षाचालकाला त्याच्या प्रश्नाचं उत्तर मिळण्याऐवजी फटके पडले असल्याचं पहावयास मिळालं आहे. त्यामुळे सामान्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जात असल्याची टीका आता विरोधकांकडून केली जात आहे.
COMMENTS