उस्मानाबाद – जिल्ह्यातील भाजपचा एक नेता लोकसभेची उमेदवारी मागण्यासाठी मातोश्रीवर
फेरा मारीत आहे. हा नेता नेमका कोणता, याची उत्सुकता राजकीय कार्यकर्त्यांना लागली असून हा विषय चर्चेचा ठरत आहे. भाजप-सेना युतीमध्ये उस्मानाबादची जागा शिवसेनेच्या वाट्याला आली आहे. दरम्यान
विद्यामान खासदार प्रा. रवींद्र गायकवाड यांच्या नाराजीचा फायदा घेण्यासाठी खासदार विरोधी गट सक्रीय झाला आहे. विद्यमान खासदारांना तिकीट देण्याऐवजी अन्य कोणालाही उमेदवारी द्या, पण त्यांना पुन्हा संधी देऊ नका. त्यांच्या नॉटरिचेबल प्रकरणाचा फटका निवडणुकीत बसू शकतो. हेच कारण पुढे करीत सेनेतील खासदार गायकवाड विरोधीगट अधीकच सक्रीय झाला आहे. त्यात आता भर पडली आहे ती, भाजपच्या एका नेत्याची. या नेत्याने स्वतःच्या उमेदवारीसाठी थेट मातोश्री गाठली आहे.
दरम्यान गेल्या वर्षातच हा नेता अंतर्गत गटबाजीने सेनेतून भाजपमध्ये गेला होता. मात्र भाजपमध्येही डाळ
शिजत नसल्याचे दिसून आल्याने पुन्हा सेनेत येण्याचा प्रयत्न करीत आहे.सध्याच्या अंतर्गत गटबाजीत आपल्याला स्थान मिळाले तर बघावे, या उद्देशाने
या नेत्याने लोकसभेची उमेदवारी मिळविण्यासाठी थेट मातोश्री गाठली आहे. त्यामुळे भाजपचा हा नेता नेमका कोण, याची चर्चा जिल्ह्याच्या राजकीय वर्तूळात रंगू लागली आहे.
COMMENTS