मुंबई – विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होताच भाजपला धक्का बसला आहे. इगतपुरी तालुक्यातील जिल्हा परिषद सदस्य हिरामण खोसकर यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. तर श्रीरामपूर तालुक्यातील सेनेचे लहू कानडेदेखील काँगेसमध्ये गेले आहेत. 2014च्या विधानसभा निवडणुकेवेळी कानडे यांनी शिवसेनेतून निवडणूक लढवली होती. त्यांनी आता काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यामुळे शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत त्यांनी पक्षप्रवेश केला आहे.
दरम्यान लोकसभा निवडणुकीत दारूण पराभव झाल्यानंतर काँग्रेस-राष्ट्रवादीतील अनेक नेत्यांनी शिवसेना – भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे काँग्रेस-राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला आहे. परंतु आता निवडणुकीची तारीख जाहीर होताच भाजपमधील इगतपुरी तालुक्यातील जिल्हा परिषद सदस्य हिरामण खोसकर यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. तर श्रीरामपूर तालुक्यातील सेनेचे लहू कानडे देखील काँगेसमध्ये दाखल झाले आहेत.
COMMENTS