बीड – निवडणुकीच्या तोंडावर भाजपला धक्का बसला असून आष्टी मतदारसंघातले भाजपचे नेते आणि माजी आमदार साहेबराव दरेकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. अजित पवार यांच्या उपस्थितीत दरकेर यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. आष्टी मतदारसंघात कडा येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार बाळासाहेब आजबे यांच्या प्रचारार्थ अजित पवारांची सभा होती. या सभेतच दरेकरांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे.
दरम्यान दरेकर यांनी आष्टीमधून भाजपची उमेदवारी मागीतली होती. अपक्ष म्हणून त्यांनी उमेदवारी अर्जही भरला होता. परंतु भाजपने त्यांना उमेदवारी न देता भिमराव धोंडे यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे दरेकर यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिली आहे. दरेकर हे भाजपचे आमदार सुरेश धस यांचे व्याही असून ते राष्ट्रवादीत जाणं हा पंकजा मुंडे यांनाही धक्का मानला जात आहे. काही दिवसांपूर्वीच काँग्रेसचे परळीतले नेते टी.पी. मुंडे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्याचाच वचपा काढण्यासाठी राष्ट्रवादीने दरेकर पक्षात घेतलं असल्याचंही बोललं जात आहे.
COMMENTS